संधिवात

संधिवात

सांध्यात किंवा आजूबाजूला दुखले कि, व्यवहारात त्याला संधिवात म्हणतात. यातच मानेचे, पाठीचे व कंबरेचे दुखणेही येते. सांधे हा मूळचा संस्कृत शब्द आहे. सांधे म्हणजे सांधा. वात हाही संस्कृत शब्द. संधिवाताला इंग्रजीत ‘ऱ्हुमॅटिझम’ म्हणतात. ऱ्हुम या ग्रीक शब्दाचा अर्थ प्रवाही किंवा वाहणारा (स्रवणे, पाझरणे). सूज येते ती द्रवामुळे पण बोली भाषेत सुजेमुळे किंवा सूज नसतानाही जेव्हा वेदना होतात तेव्हा त्याला ऱ्हुमॅटिझम असेही म्हणतात.

संधिवाताचे प्रकार

  • झिजेचे संधिवात
  • सुजेचे संधिवात
  • सांधेदुखी
  • सर्वांग वेदना
  • मुलांचे संधिवात

संधीवाताची कारणे

  • अतिश्रम,व्यवसाय,मांडी घालने
  • दोन पायावर बसणे, बैठे काम
  • अपघाताने सांध्यांना इजा सांध्याची शस्त्रक्रिया
  • स्थूलता वाढवणारे आयुर्मान वार्धक्य
  • मासिक पाळी लवकर जाणे
  • गर्भ पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया
  • धूम्रपान मद्यपान मांसाहार अनुवंशिकता
  • आंतरिक प्रतिकारशक्तीचे दोष